औरंगाबाद- घरफोडी, वाहनचोरी इत्यादी गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना आज (ता.१६) परत केला. या वेळी ५५ व्यक्तींना ११ लाखांचा मुद्देमाल परत करण्यात आला.
शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील
पोलिस ठाणे
अंतर्गत चोरी झालेली वाहने, मंगळसूत्र, रोख रक्कम अशा गुन्ह्यांचा तपास
करून चोरट्यांकडून हस्तगत केलेल्या दुचाकी, सोनसाखळी, मंगळसूत्र, रोख रक्कम असा एकूण
१० लाख ९८ हजारांचा
मुद्देमाल पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते
नागरिकांना सुपुर्द करण्यात आला.
यामध्ये सिडको हद्दीतील १४,
सिटीचौक हद्दीतील
२
, क्रांतिचौक हद्दीतील
१३,
वेदांतनगर
हाद्दीतील ४, जिन्सी ५, एमआयडीसी वाळूज ७,
मुकुंदवाडी ४,
जवाहरनगर ६ अशा एकूण ५५ नागरिकांचा
समावेश आहे. यावेळी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उप-आयुक्त निकेश
खाटमोडे,
उप-आयुक्त डॉ
राहुल खाडे, सहाय्यक आयुक्त डॉ नागनाथ कोडें सह अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.














